राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहराच्या संकेत स्थळावर आपले मन:पूर्वक स्वागत आहे.

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. विद्येचे माहेरघर, लेखक, कलावंत, विचारवंत, समाज सुधारक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले एक समृद्ध शहर.

आज पुणे शहर एका नव्या युगाकडे झेपावत आहे. जागतिक पातळीवरील एक अग्रेसर शहर म्हणून पुढे येत आहे. माहिती - तंत्रज्ञानाचे केंद्र, ऑटोमोबाइल हब, उद्यानाचे शहर, नवे उद्योग आणि रोजगार निर्मितीचे शहर, कला आणि क्रीडा क्षेत्रातील अत्याधुनिक सोयी - सुविधा उपलब्ध असलेले शहर म्हणून आपली नवी ओळख निर्माण करीत आहे.

हा विकासाचा वेग आणि आलेख सतत गतिमान ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध आहे. पुणे शहरातील सुसंस्कृत नागरिकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि २०१२ च्या मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून दिले.

मागील अडीच वर्षाच्या काळात आम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे शहरातील अनेक प्रश्न सोडविले आहेत. अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत. आम्ही केलेल्या विकास कामांची नागरिकांना माहिती व्हावी आणि त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. शहराच्या विकास कार्यात त्यांनी सहभागी व्हावे, सूचना कराव्यात हाच या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

पुणे शहराचा जागतिक पातळीवरील एक उत्कृष्ठ शहर म्हणून विकास करणे हेच आमचे ध्येय आहे. पुणे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे शहरीकरण याचा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर पडत आहे. या सर्व समस्यांवर मात करुन आपले पुणे शहर एक आदर्श शहर बनवायचे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सामील व्हा! आणि या विकासपर्वात आपला सक्रीय सहभाग नोंदवा.